माझे गाव

ग्रामपंचायत पुणदीवाळवा,
ता. पलूस, जि.सांगली.

प्रस्तावना-

नावाविषयी माहिती-स्थापना 23/09/1955.
सांगली जिल्हयातील पलूस तालुक्यातील पुणदी हे छोटेसे आकर्षक गाव आहे. पुणदी गावच्या पश्चिम दिशेस कृष्णा नदी वाहते. तिच्याच पवित्र जलस्त्रोताने पुणदी गावचा परिसर हिरवळीने नटलेला आहे.
पुणदी गावच्या स्थापनेविषयी, नामकरणाविषयी अनेक आख्यायिका प्रसिध्द आहेत. पुणदी गावचा हा परिसर महाराष्ट्रातील दंडक आरण्याचा भाग समजला जात होता. या अरण्यात अनेक साधुजन महादेवाची आराधना, तपश्चर्या व यज्ञयाग करीत होते. आशावेळी आसुरांनी या साधुजनांना त्रास देण्यास आरंभ केला. त्यांचे यज्ञयाग मोडले. तेव्हा शिवप्रभुंनी आदिमायाशक्ती पार्वतीस या आसुरांचा संहार करण्यास सांगितले. तेव्हा तपश्चर्येत लीन असणा-या साधुमुनीस आदिमायेने दर्शन दिले. व आपल्या धुनुष्यबाणाने आसुरांचा वध केला. त्यानंतर तेथील साधुमुनींनी पार्वतीमातेने प्रकट दर्शन दिले. तेव्हा सर्वांनी माते पुण्यदायी तुम्ही उदो-उदो असा जय जयकार केल.
साधुंच्या पुण्यदेवी पुंदाई पार्वती या शब्द प्रयोगावरफन पुणदी गावचे नाव प्रशासन आले. ज्या ठिकाणी देवीने प्रकट दर्शन दिले. त्या ठिकाणी साधु मुनींनी पुंदाई देवीचे छोटेसे मंदीर उभारले. पुंदामातेच्या मंदीरासमोर कृष्णामाईच्या पैलतीरी खडकावर श्री. शंकर ध्यानस्त होते. त्यांच्या खडकेश्वर असा जय जयकार करून खडकेश्वर अशी लिंग स्थापना केली. श्री. खडकेश्वर अशी लिंग स्थापन केली. श्री. खडकेश्वर व श्री. पुंदाई समोरा -समोर मंदीरे आहेत. पुंदाईवरफन पुणदी व श्री. खडकेश्वरावरून खेड ही गावे प्रसिध्दीस आली. प्राचीण काळी पुंदाई व खडकेश्वर यांना जोडणारा रस्ता अस्तित्वात होता. खडकेश्वर येथे घाट होता.