ग्रामदैवत

ग्रामदैवत-
अराध्य दैवत
 श्री. मारुती.

 • श्री. कृपेवरुन पुणदी येथील ग्रामस्थांचे अराध्य दैवत म्हणजेच श्री. मारुती हे होय. पुणदीचे ग्रामदैवती श्री. हनुमानाची (मारुती) स्थापनानाथपंथीच श्री. उल्लास महाराज ब्रम्हचैतन्य यांनी तेराव्या शतकात केली. श्री. मारुती देवाची मुर्ती दक्षिणमुखी असुन डाव्या हाती कट्यार व उजवा हात आर्शिवादास उभा आहे. ही मूर्ती पश्चिम दर्शनी चार फुट उंचीची सेंदुर वर्णिय आहे. चैत्र पौर्णिमेस सुर्योदयास जन्मकाळ गुलाल, फुले, वाहून साजरा करतात. या उत्सवास आसपासच्या परिसरातील भक्तजन जन्मकाळाच्या वेळेस मोठया संख्येने उपस्थित असतात. मंदीरासमोर भक्ती सागराने हेलावणारा जनसागर पाहताना डोळांचे पारणे फिटते.
 • हे जागृत देवस्थान आहे. श्री. मारुती सर्व भक्तांच्या हाकेला धावतात. भक्तांच्या संकटाचे हरण करतात. उपस्थित असलेल्या हजारो भाविकांना महाप्रसाद म्हणून सुठवडा देण्यात येतो. सध्या मंदीराच्या जिर्नोद्दराचे काम मोठया प्रमाणात सुरफ असून नवीन मंदीराचा आराखडा अभियंत्या कडून तयार करण्यात आला आहे. कामास सव्र भक्तजणांची सढळ हस्ते मदत होते.
 • या क्षेत्रात क वर्ग तिर्थक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. तिर्थक्षेत्रिय वैशिष्ठयांचा विचार केला असता या क्षेत्रातील ती सर्व वैशिष्टये पहावयास मिळतात. श्री मारुतीची अभिषेक, पुजा, आरती दररोज पहाटे व सायंकाळी भक्त जाणांच्या समवेत टाळ.मृदंगाच्या सुरेल भक्तांच्या भावमय वातावरणात होतात. दिवसें-दिवस भक्तगणांची संख्या वाढत आहे.
 • श्री. मारुती हे शक्तीचे दैवत आहे. या देवतेपुढे नतमस्तक होणा-या भक्तांच्या मनात नवीनच जोम, उत्साह, जगण्याची नवीन उमेद निर्माण होते. प्रत्येक मानवाच्या जीवचनात श्रध्देचा एक उच्च व्यक्तिमत्व असणं गरजेच आहे.
 • पुणदीच्या या पुणभुमीत सद्गुरु श्री.जी.आय. स्वामी महाराज चेणी कुपीकर उन्हाळयात चार महीने कृष्णा स्नानास आले. त्यांची पुणदी येथील बहिरु नाना पाटील यांनी गुरुदीक्षा घेतली. पुढे सद्गुरु महाराज पुणदी येथे राहीले व सामाधीस्त झाले.
 • स्वामी बहुभाषी होते. संस्कृत, इंग्रजी, हिंदी,कन्नड, मराठी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. अनेक भाषांकवरुन त्यांचे लेखन वाचन करीत होते. बहीरफ नाना पाटील यांच्या पुणदी च्या जागेत स्वामींच्या सुचनेनुसार मठ बांधण्यात आला. 1953 साली त्यांच्या घराजवळ झाडाखाली होमहवन करण्यात येवुन अनेक भक्तांना गुरुदिक्षा व उपदेश देण्यात आला.
 • अंत:काळात ध्यानी आल्यानंतर त्यांची कल्पना निकटच्या भक्तांना दिली त्यांनी पुढे कसे वागरावे याविषयी उपदेश केला. 1 जुलै 1968 या दिवशी वयाच्या 92 व्या वर्षी पुणदी शिवारातील मठात ते समाधीस्त झाले. त्यांचा एकांतवास मठ आहे. त्यांनी ब्रहमचार्य व विविध ग्रंथसार ग्रंथ प्रसिध्द केले. स्वामी महाराजांच्या पुण्यप्रत सहवासाची स्मृती जागवण्यासाठी महाशिवरात्रीला पुणदी येथे उत्सव होतो.

कृष्णाबाई मंदीर.


 • मरिमी मंदीर.

 


 • सटवाई मंदीर.       नागोबा मंदीर.      नरसोबा मंदीर.

  


 • भावई मंदीर.
 • व्यंकटेश्वर मंदीर.
 • विठ्ठल-रखुमाई मंदीर.
 • अंबा माता मंदीर.
 • वेतालबा मंदीर.
 • म्हसोबा मंदीर.

ही सर्व मंदीरे अत्यंत चांगल्या प्रकारे आहेत.

मारुती मंदीराच्या पाठीमागे कृष्णतमहाराजांची समाधी आहे. त्यास वैराग्याचा मठ म्हणतात.