धार्मिक सांस्कृतिक व मनोरंजनात्मक उत्सव

ग्रामदैवत हनुमान जयंती उत्सव-

 

  • चैत्र पौर्णिमेच्या सुर्योदयाच्या पुर्वी 8 ते 15 दिवस गावामध्ये गुडीपाडवा दिवशी लिंब  खाण्याच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ एकत्र येतात. त्यावेळेस गावच्या जागृत हनुमान जन्म उत्सव यात्रेचे चर्चा स्वरुप यात्रेतील सर्व कार्यक्रम व उत्सव कसा साजरा करायचा याचे सर्व नियोजन ग्रामस्थांच्या साक्षीने केले जाते. चैत्र महिना सुरु होणपुर्वी जवळ जवळ शेतीची कामे संपत आलेली असताना. शेतीची कामे संपत आलेली असतात. त्यावेळी सर्वांना यांत्रेचे वेध लागलेले असतात. या उत्सवाला बाहेरगावी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने गेलेले नातेवाइक व इतर निष्ठेने भक्ती करणारे भाविक या यात्रेनिमित्त या ठिकाणी एकत्र येतात. यात्रेत जन्मउत्सव बैलांचे गाडे, नैवद्य, आंबील, कुस्त्यांचा जंगी आखाडा, लोकनाटय तमाशा व इतर मनोरंजक कार्यक्रमांची रेलचेल असते.
  • चैत्र शुल्क पौर्णिमेला गावाची यात्रा ही यात्रा म्हणजे दिवाळीच साजरी होते. प्रत्येक्षात यात्रेचा दिवसव उजडतो. त्या दिवशी सकाळी भाविक भक्तजन आंघोळ करुन गावात जागृत हनुमान मंदीरा समोर जमतात. सकाळी गावातील दुकाने, बाजारपेठ सजवलेली असतात यात्रेच्या मुख्य दिवशी बैलांची मिरवणुक काढली जाते. स्थानिक ग्रामस्थ व पाहुण्यांची अलोट गर्दी असते. बैलांच्या शिंगांना रंग लावून, बेगडे लावून सजवली जातात. बैल वाजत काढणेसाठी ढोल, लेझीम, बॅंड वाजंत्रीच्या ठेक्याच्या संगीत गाण्याच्या तालावर तरुन मुले आणि भाविक भक्त नाचत असतात. बैलांच्या अंगावर गुलाल टाकुन पुन्हा देवाची सासन काढी काढुन मारुतीच्या नावांन चांगभल गजरात मिरवणुक गावाच्या बाजारपेठेतुन मुख्य ग्रामदैवताच्या देवळात नैवद्य दाखविण्याच्या आणि गुळ साखरेवर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम सुरु असतो. मिरवणुकीचा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजन घरी जातात. यात्रेच्या निमित्ताने केलेल्या गोडधोड जेवणावर ताव मारुन थोडा वेळ विश्रांती घेतात.
  • रात्री देवाच्या मुख्य आकर्षक असलेल्या आरतीला सुरवात होते. या आरतीच्या प्रसंगी गावक-यांनी ठरवलेली शोभेची दारु व नौसाचे औट रात्रभर उडविले जातात. दैदिप्यमान असे आकर्षक शोभेचे दारुकाम करुन रात्र जागुन काढली जाते. तद्नंतर या प्रसंगी ज्या भक्तांना नवसाला पावणा-या देवाच्या दंडस्थानाची सुरुवातही रात्री वारा बारा पासून पुढे भाविक दंडस्थान घालून आपले नवस पुर्ण करतात. हे दंडस्थान देववा-या पश्चिमेला असणा-या कृष्णा नदीतुन आंघोळ करुन ओल्या पडदीने देवापर्यंत दंडस्थान घालतात.
  • त्यानंतर दुस-या दिवशी सकाळी पाहुने भक्तांसाठी करमणुक कार्यक्रम सादर केला जातो व दुपारी जंगी कुस्तांचा आखाडा होतो. कुस्ती मैदानात नामवंत पैलवानांच्या कुस्त्या लावून योग्य बक्षिस दिले जाते. यात्रेच्या निमित्ताने वस्तंची विक्री करणरे दुकानदार आले असतात. त्यामुळे हॉटेल्स, पाळणेवाले, बांगडेवाली, फुगेवाले, भेळवाले, लहान मुलांचे खेळणे विक्री करणारे दुकानदार मोठया प्रमाणात आलेले असतात. यात्रेतील खाद्यपदार्शाची चव निराळीच असते. तमाशाकडे सर्व वयोगटातील पुरुषांची पाउले वळतात. तमाशात प्रेक्षकांच्या शिट्टयांचा मारा सुरु होतो. गणगवळण, मराठी, हिंदी, गीतांचा कार्यक्रम याव्दारे प्रेक्षकांत जनजागृती केली जाते.
  • तसेच प्रतिवर्षीप्रमाणे गणेश उत्सवात गावातील तरुन गणेश मंडळे जागृत होउन ऐतिहासिक, सामाजिक, प्रबोधन करणारेद देखावे व कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच हनुमान मंदीरात श्रीकृष्ण जनउत्सव साजरा केला जातो. त्यात प्रवचन, पारायन, किर्तन यांचा समावेश केला जातो. त्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह केला जातो. गावात दत्त जयंतीनिमित्त भजन स्पर्धा, आनंदाने साजरा केला जातो.

जयंती-

  • शिवजयंती.
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती.
  • मोहरम.
  • महाशिवरात्री.

इत्यादी सर्व धर्मान्वये सण मोठया उत्साहात साजरे केले जातात.

  • 15 ऑगष्ट व 26 जानेवारी हे राष्ट्रीय सणही मोठया प्रमाणात साजरे केले जातात. या राष्ट्रीय सणाला शाळेतील विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम, विविध कसरतींचे प्रदर्शन करतात.