संस्था

संस्था: -(सहकारी)

  • या गावचे जेष्ठ सुपुत्र कै. रावजी जयराम मोरे पाटील यांनी दित्र 13/09/1996 रोजी हनुमान विविध कार्यकारी सोसायटी पुणदी स्थापना केली असून त्यामाफर्त शेतक-यांना 1 कोटी पर्यंत कर्जाचे वाटप केले जाते.

  • या संस्थेच्या माध्यमातुन शेतीला पुरक असणारे ट्रक्टर पाईपलाईन, म्हैस, गाई इतर अवजारे यासाठी कर्जपुरवठा केला जातो.
  • तसेच या संस्थे माफर्त स्वतंत्र स्वस्त दुकान चालविले जाते. या माध्यमातुन लोकांना जीवनावश्यक वस्तु आणि रॉकेल धान्य इ. वस्तुंचा शासनाच्या नियमाप्रमाणे पुरवठा केला जातो.
  • गावात महिलांचे 35 बचत गट आहेत. या माध्यमातुन विविध प्रकल्प उद्योग सुरु आहेत.
  • शेतीला पाणीपुरवठा करणा-या सार्वजनिक पाणी पुरवठा संस्था आहेत.