शैक्षणिक

शैक्षणिक सुविधा-

  • गावच्या वेशीतुन आत प्रवेश केल्यानंतर पश्चिम बाजुला क्रांतीसिंह नानापाटील माध्यमिक विद्यालय आहे. गावच्या दक्षिणेस सांगली जि.प. मराठी शाळा असुन त्याची स्थापना दक्षिणेस सांगली जि.प. मराठी शाळा असुन त्याची स्थापना 1907 साली झाली. गावच्या उत्तरेला इंगळेवस्ती असुन तेथे वस्तुशाळा आहे. तेथे 1 ते 4 पर्यंत शिक्षण देणारी शाळा आहे. इमारत जुन्या पध्दतीची कौलारु आहे. तरी प्रशस्त व सुस्थितीत आहे. इंगळे वस्ती शाळा पुर्णपणे स्लॅबची आहे. तसेच शाळेच्या भोवती पुर्णपणे कंपाउंड आहे.
  • शैक्षणिक विकासाबरोबरच विदयाथ्र्यांना खेळाची आवड व्हावी यासाठी पुरेशा प्रमाणात खेळाचे मैदान आहे. इ. 3 रीच्या व इयत्ता 4 थीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी शिक्षक अथक परिक्षम घेत असतात. त्यामुळे या शाळेचे विद्र्थी स्कॉलरशिप व एम.टी.एस. परीक्षेमध्ये जिल्हयास चमकलेले असतात. इयत्ता 4 थी नंतर पुढील शिक्षणाची सोय व्हावी या उद्ेशाने गावातील बुर्जर्ग मंडळीनी एकत्र येउन यशवंत काशिद शिक्षण संस्था पुणदी या संस्थेमाफर्त क्रांतीसिंह नाना पाटील विद्यालयाची स्थापना करणेत आली. या शाळेची इमारत सुसज्जय आर.सी.सी. इमारत आहे. इमारतीपुढे आकर्षक व रेखीव पध्दतीने झाडे लावली आहेत. त्यामूळे शाळेच्या र्सादर्यात भर पडली आहे.
  • या शाळेमध्ये इयत्ता 5 ते 10 पर्यंत शिक्षणाची सोय आहे. सन 1984 ला शाळेची स्थापना का्रंतीवीर नागनाथ (आण्णा) नायकवडी यांच्या प्रेरणेतुन झाली. त्या समयी सर्व ग्रामस्थ एकत्र येउन संस्था स्थापन करणेत आली त्यानंतर या गावातील मुले दुस-या परगावी जाणारी मुले आमच्या गावच्या शाळेत शिक्षण घेउ लागली. या शाळेत एक मुख्याध्यापक व दहा शिक्षक एक क्लार्क आणि चार शिपाई असा अद्यावत शिक्षक स्टाफ आहे. या शाळेत सुसज्जय ग्रंथालय व प्रयोग शाळा आहे. सतत 70 टक्के ते 89 टक्के असा शालेय एस.एस.सी. चा निकाल हा सतत चढत्या क्रमाने असतो.

 


अंगणवाडया.

  • गावात ऐकून तीन अंगणवाडया आहेत. त्याचे काम अत्यंत चांगल्या प्रकारे सुरु आहे. या सर्व शिक्षणामुळे शिक्षण हेच जीवन हे ब्रिद समजुन वाटचाल चालु आहे. या शाळेतुन असे अनेक गुणवंत विद्यार्थी डॉक्टर, अभियंते, प्राचार्य, वकील, राज कारणी, सैनिक, शासकीय अधिकरी, उद्योजक, चांगले आधुनिक पध्दतीने शेती करणारे शेतकरी तयार झाले.