जलस्त्रोत

जलस्त्रोत-

  • गावाच्या पश्चिम बाजुस उगम पावलेली कृष्णा नदी व कोयाना नदी वाहते. या नदीवर ठिकठिकाणी खाजगी आणि सहकारी जलसिंचन संस्था निर्माण करुन शेतकरी वर्ग नदीवर लिफ्ट इरिगेशन करुन शेतीला पाणी पुरवतो.
  • तसेच सहकारी तत्वावरील लिफ्ट इरिगेशन उत्तम पध्दतीने सुरु आहे.
  • गावच्या उत्तम बाजुने कृष्णा पोटपाट कालवा वाहतो. त्यावर सुध्दा पाणी नियोजन करुन शेतकरी शेतीला पाणी पुरवठा करतो. या कालव्यातील पाण्याचा उपयोग आजुबाजुच्या परिसराच्या शेतीसाठी होते.
  • त्याचबरोबर गावात 25 विहीरी व 10 बोअर, 15 सार्वजनिक विहीरी आहेत.
  • शेतीसाठी 12 महिने जलसिंचनाची सोय उपलब्ध असल्यामुळे गाव हिरवेगार आणि धनधान्याने समृध्द आहे.